जाणून घ्या : पार्ले बिस्कीट या कंपनी मागची ही मोठी संघर्षमय कहानी

पार्ले-जी बिस्कीट माहीत नाही, असा व्यक्ती भारतभरात सापडणार नाही. पार्ले जी म्हणजे आपल्या जीवनातील आहाराचा एक अविभाज्य घटक आहे. तुम्हाला पार्ले-जी हे नाव का पडले माहिती आहे का? एका व्यापाऱ्याने मुंबईतील पार्ले येथे गोडाऊन घेऊन बिस्किट बनवण्याचे काम सुरू केले. तेव्हापासून त्याला पार्ले बिस्कीट हे नाव पडले.

पार्ले बिस्कीट बनवण्यामागची प्रेरणा ही खूप मोठी होती. स्वातंत्र्यपूर्व काळात चॉकलेट आणि बिस्कीट हे फक्त श्रीमंताचे शौक होते. त्यावेळी परदेशातून चॉकलेट व बिस्कीट यायचे. भारतात मात्र कुठेही चॉकलेट, बिस्कीट बनवण्याची मोठी कंपनी किंवा कारखाना नव्हता. हे चॉकलेट गरिबांना कमी दरात उपलब्ध करून द्यायचे म्हणून भारतातील व्यापारी मोहनलाल दयाल यांनी भारतात चॉकलेट आणि बिस्कीटचा कारखाना सुरू करण्याचे ठरवले.

यासाठी ते जर्मनीला गेले आणि तिथे ते चॉकलेट बनवायचे शिकले. १९२९ साली त्यांनी तब्बल ६०००० रुपयांना चॉकलेट बनवण्याची मशीन विकत घेतली आणि तिला भारतात घेऊन आले. स्वतः रेशनींग दुकान असून त्यांनी भारतीय जनतेला चॉकलेटचा आनंद मिळावा यासाठी त्यांनी नवीन व्यापार सुरु केला.

सुरुवातीला त्यांच्याकडे जवळपास १२ कर्मचारी काम करत होते. कंपनीत सुरुवातीला ऑरेंज कॅंडी हे चॉकलेट बनवले जायचे. बरेच दिवस कंपनीला नाव नसल्यामुळे त्यांनी पार्ले येथे गोडाऊन असल्यामुळे पार्ले असे कंपनीचे नाव ठेवले. बिस्किटाची ही चॉकलेट सारखीच परिस्थिती होती. बिस्किट फक्त श्रीमंतांकडे खायला मिळायचे. यानंतर दयाल यांनी बिस्किटाचे ही उत्पादन सुरू केले आणि भारतातील सामान्य लोकांकडे चॉकलेट आणि बिस्किट दिसू लागली.

भारतातील गरीब जनतेला बिस्कीट खाता यावं यासाठी मोहनलाल यांनी “पार्ले ग्लुको” नावाचे बिस्कीट बनवले. गव्हापासून बनवलेलं हे बिस्कीट सामान्य लोक देखील विकत घेऊ शकले.
आजही पार्ले जी बिस्कीट हे सामान्य घरात दिसते. एखादा माणूस जेव्हा संघर्ष करुन मोठा होतो, तेव्हा तो पार्ले बिस्कीट खाऊन दिवस काढले असे सांगतो. खर तर संघर्ष म्हणजेच पार्ले बिस्कीट आहे आणि पार्ले बिस्कीटच्या उत्पादनामागे आणि पार्ले बिस्कीट कंपनी मोठी होण्यामागे मोठी संघर्षमयी कहानी आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*