काँग्रेसच्या या ट्विटवर अनुपम खेर यांनी दिले ‘हे’ गमतीशीर उत्तर

मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक ट्रेंड चालू होता. ‘मेरा पीएम कमजोर है’ असे म्हणत कितीतरी हजारो लोकांनी ट्विट केले होते. छत्तीसगड काँग्रेसनेही ‘नरेंद्र मोदी अब तक के सबसे कमज़ोर प्रधानमंत्री हैं।’ असं ट्विट केले. यालाच गमतीशीर प्रत्युत्तर देत अनुपम खेर म्हणाले की, चल….. झूठे कहीं के!! ये जोक तो 1st April वाले दिन भी फ़िट नहीं बैठता…

गमतीशीर उत्तर देत मोदी समर्थक आणि अभिनेते अनुपम खेर यांनी ट्रेंडमधील हवा काढल्याचे मोदी समर्थकांचे म्हणणे आहे. परंतु या ट्रेंडमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. या ट्रेंडला खूप उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. छत्तीसगड काँग्रेसच्या या ट्विट ला ‘नरेंद्र मोदी अब तक के सबसे कमज़ोर प्रधानमंत्री हैं।’ ५ हजार लोकांनी रिट्विट केले तर ३२ हजार लोकांनी लाईक केले.
या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काँग्रेसने ते ट्विट ९ मे रोजी केले होते. तर त्याला भाजपकडून अनधिकृतरित्या उत्तर मात्र १६ मे रोजी आले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*