लोक चप्पलच्या प्रदर्शनात बसवतील; राणेंनी केली पवारांवर जिव्हारी लागणारी टीका

मुंबई :

सध्या माजी खासदार निलेश राणे आणि युवा आमदार रोहित पवार यांचे ट्विटरवर राजकीय युद्ध चालू आहे. त्यानंतर यात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उडी घेतली होती. तनपुरे यांच्याविषयी अराजकीय भाषा वापरल्यामुळे रोहित पवारांनी तनपुरे यांची पाठराखण केली. याच पार्श्वभूमीवर ‘तुझ काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तूला,’ असे म्हणत राणे यांनी जिव्हारी लागणारी टीका रोहित पवारांवर केली आहे.

तसेच हा ट्रेलर असल्याचे सांगत ते म्हणाले की, बोलणाऱ्याची लायकी बघून उत्तर देतो मी. धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे.

सध्या राणे आणि पवार यांच्यात हे राजकीय युद्ध ‘साखर ऑडीट” या विषयापासून सुरू झाले होते परंतु आता तो विषय बाजूला राहिला असून ते एकमेकांवर व्यक्तिगत टीका करत आहेत. “साखर कारखाना, कुक्कुटपालन” या दोन शब्दांना घेऊन ते एकमेकांना टोले लगावताना दिसत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*