वाचा, शाळेतील ‘हे’ जोक्स वाचून हसू आवरणार नाही..!

१) बंगळूर मध्ये एका शिक्षकाने वर्गातील
एका मुलाला कानाखाली मारले त्यामुळे त्याला 50,000 रूपये दंड
आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात आला
.
आमच्या वेळेला जर असे असते तर

आज माझ्या कडे 2/4 बंगले, 3/4 कार, 10 एकर

शेती चा मी मालक असतो….इतका मार खाल्लाय राव…

२) गुरूजी मराठी व्याकरण शिकवत होते.

“मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत:
कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग.
‘मी व्हिस्की पितो’ किंवा ‘मी रम पितो’ या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो?’

बंडया: तरतरी प्रयोग..!
गुरूजीनी व्यकरणाची पुस्तके जाळली

३) शिक्षक: दहा नारळांपैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील.

गण्या: दहा.
शिक्षक: ते कसे?

गण्या: नासलेले नारळ सुद्धा नारळच राहतील.
त्यांचा काय फणस होतील काय मास्तर

४) बंड्याचे आजोबा त्याच्या शाळेत बंड्याला भेटायला जातात.

आजोबा: (शिक्षकांना) जरा बंड्याला बोलवता का?

शिक्षक: अहो, तो तर आज तुमच्या दहाव्याला गेला आहे.

५) शिक्षक : बंड्या ऊठ. सांग बरं आपल्या देशाचा मृत्यूदर किती आहे?

बंड्या : १०० टक्के.

शिक्षक : कसं काय?

बंड्या : कारण, जो जन्माला येतो तो मरतोच ना.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*