आनंदाची बातमी; पुण्यात कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपी यशस्वी

पुणे :

कोरोना बाधित रुग्णावर केलेली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली आहे. ही थेरपी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये पार पडली आणि ती यशस्वी झाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

प्लाझ्मा थेरपीमुळे उच्च रक्तदाब आणि अतिस्थूलपणा असलेली कोरोनाबाधित व्यक्ती ठणठणीत बरी झाली आहे. १० आणि ११ मे या दिवशी थेरपी केलेल्या रुग्णाला आता कोविड वॉर्डमधून हलवण्यात आले असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितली.

प्लाझ्मा थेरपी काय आहे?

एखादा विषाणू शरीरात शिरला की आपलं शरीर त्याला हुसकावून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करतं. विषाणू आणि आपल्यात होणाऱ्या या लढाईत आपले सैनिक असतात ते अँटिबॉडीज. एका विशिष्ट विषाणूला मारण्यासाठी आपलं शरीर विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करतं.

या अँटीबॉडीज आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात. कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शरीरात सोडल्या तर मग त्या वृद्ध व्यक्तीचं शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीनं दोन हात करू शकतं.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*