काल राज्यात नवीन २३४५ कोरोना बाधीत

काल दिवसभरात महाराष्ट्रात एकूण २३४५ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत तर राज्यात आता एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ४१६४२ झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिली.

काल दिवसभरात कोरोना बाधीत रुग्णांचे प्रमाण जरी वाढले असले तरीही कोरोना पासून मुक्ती मिळवणार्‍या रुग्णांची संख्याही चौदाशेपेक्षा अधिक आहे. जवळपास एका दिवसात १४०८ कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोना बाधीतांची संख्या वाढत असली तरीही कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याची संख्या ही दिलासा देणारी आहे. राज्यात अजूनही एकूण २८४५४ रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत तर एकूण ११७२६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत काल जास्त कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*