मासिक पाळीमध्ये पॅड बदलण्याची योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या

मासिक पाळी आणि स्रियांचे आरोग्य याचा थेट एकमेकांशी सबंध असतो. त्यावेळी स्वच्छता राखणे तसेच पाळी दरम्यान योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. आजकालच्या स्रियांच्या जीवनशैलीत बरेच बदल झाले आहेत. स्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे त्यांचे आयुष्य धकाधकीचे झाले आहे. तसेच त्यांच्या जीवनात तणाव वाढला आहे. करिअर, कामाचा ताण, घरातील काम इत्यादी गोष्टींमुळे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. तर काही स्त्रियांना शिक्षण किंवा कामानिमित्त दिवसभर बाहेर राहावे लागते. अशावेळी काही जणी स्वच्छता पाळण्यासाठी  कंटाळा करतात किंवा स्वच्छता पाळणं काहींना शक्यच नसते. पण जर मासिक पाळीमध्ये योग्य वेळी पॅड न  बदलल्यास तुम्हाला अनेक गंभीर समस्यांना समोरे जावे लागू शकते. त्यामुळे पॅड योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं बदलणं आवश्यक आहे.

हि घ्या काळजी :-

  1. रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होत आहे तर चार तासानंतर पॅड बदलावे.
  2. रक्तस्त्राव कमी होत असेल तर एक पॅड चार तासांपेक्षा अधिक वेळ वापरू नये.
  3. मासिक पाळीदरम्यान कोणत्याही स्वरुपातील पॅड आपल्या त्वचेच्या संपर्कात अधिक काळ राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
  4. मासिक पाळी वगळता अन्य दिवशीही महिलांनी रात्री झोपण्यापूर्वी पाण्याच्या मदतीनं योनीमार्ग स्वच्छ करणे गरजेचं आहे.
  5. योनीमार्ग स्वच्छ  करण्यासाठी साबण किंवा फेस वॉशचा वापर करू नये. (स्वच्छतेसाठी केवळ पाण्याचाच वापर करा)
  6. मासिक पाळीमध्ये शरीरास दुर्गंध येणार नाही याची काळजी घ्यावी.
  7. रक्तस्त्राव,घाम यामुळे काही वेळा दुर्गंध येऊ लागतो, यामुळे स्वच्छता पाळण्यास कंटाळा करू नका.
  8.  झोपण्यापूर्वी देखील पॅड बदलणं गरजेचं आहे.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*