#महाराष्ट्रद्रोहीBJP ट्रेंड दीड लाखांच्या जवळ तर #महाराष्ट्रबचाव ८५ हजारवर; जाणून घ्या नेमके का होतेय असे

मुंबई :-

एकीकडे कोरोनाचे संकट आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र भाजप करोनाचा वाढत्या प्रादुर्भावाचा  मुद्दा घेत ठाकरे सरकार विरोधात आंदोलन करत आहे. परंतु हे आंदोलन आता भाजपवर उलटले असल्याचे चित्र आहे.

का आहे #महाराष्ट्रबचाव ८५ हजार वर?

राज्यातील सत्ताधाऱ्यांना म्हणजेच महाविकास आघाडीला जागे करत कोरोनाला रोखण्यासाठी काम करावे हे सांगण्यासाठी भारतीय जनता पक्ष राज्यभर “महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करत आहे. सांगली- कोल्हापूर मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘या आपत्कालीन परिस्थितीत कोणीही राजकारण करू नये’ असे म्हणत होते. आज तेच देवेंद्र फडणवीस हे फक्त विरोधीपक्षात असल्याने राज्य सरकारच्या विरोधी भूमिका घेत आपत्कालीन परिस्थितीत राजकारण करत आहेत, असे लोकांचे म्हणणे आहे.

तसेच यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी असलेला संवाद व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे ग्राउंड वरील काम लोकांना भावत आहे. कोरोनाचा आकडा कमी होत नसला तरी सरकार व प्रशासन हे त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहेत, अशाही भावना लोकांच्या आहेत.

#महाराष्ट्रद्रोहीBJP ट्रेंड दीड लाखांच्या जवळपास का आहे ?

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे आंदोलन लोकांना पचनी पडलेले प्राथमिकरीत्या दिसत नाहीये. सर्वाना सोबत घेण्याची शिवसेनेची भूमिका, ठाकरे सरकार विषयी असलेली लोकांची भावना, मुंबईतील परिस्थिती वगळता उर्वरित महाराष्ट्रात ठाकरे सरकारने उत्तम कामगिरी केली आहे. या संकटकाळात सर्व गोष्टींचे नियोजन चांगले केले आहे.

उदारणार्थ :-

१) मजुरांचे स्थलांतर

२) करोना विषयी तातडीने घेतलेले निर्णय.

३) करोनासाठी जलद गतीने उभारलेली यंत्रणा.  

एकूणच सगळ्याच आघाड्यांवर ठाकरे सरकार उजवे ठरताना दिसत आहे.

याबाबत कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही ट्वीट करत सांगितले आहे. ते म्हणाले आहेत की, महाराष्ट्र विकास आघाडीचा #महाराष्ट्रद्रोहीBJP ट्रेंड सवालाखाच्या पुढे! संकटकाळात गलिच्छ राजकारण करण्याचा #भाजपा चा डाव जनतेने हाणून पाडला! सत्तापिपासू भाजपाला जागा दाखवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचे आभार व महाराष्ट्र विकास आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांचे अभिनंदन…

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*