शेतकरी व कष्टकऱ्यांना ५० हजार कोटींचे पॅकेज द्या; निलंगेकरांची मागणी

लातूर :

महाविकास आघाडीच्या सरकारला करोनाच्या संकटामध्ये राज्याला वाचविण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र भाजपने ‘महाराष्ट्र बचाव’ची हाक दिली आहे. त्याच आंदोलनात सहभागी होताना माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी गरिबांना ५० हजार कोटी रुपयाचे पॅकेज देण्याची मागणी केली आहे.

त्यांनी ट्विटरवर या आंदोलनात सहभागी झाल्याचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्यासमवेत म्हटले आहे की, हा निषेध आहे.. अकार्यक्षमतेचा, निष्काळजीपणाचा आणि गलथान कारभाराचा.. राज्य सरकारच्या अपयशाचा..! जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी.. निषेध..! आता तरी सरकार समस्यांकडे लक्ष देणार का?

तसेच त्यांनी त्या इमेजमध्ये असलेल्या पोस्टरवर म्हटले आहे की, राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, असंघटित कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, छोटे दुकानदार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५० हजार कोटी रुपयाचे पॅकेज द्यावे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*