अबबो, एकाच दिवसात वाढले २९४० रुग्ण; कोविड १९ वेगाने फोफावतोय

मुंबई :

लॉकडाऊन करून-करून अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले तरीही करोना विषाणूचा कहर काहीकेल्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यातही महाराष्ट्र राज्यातील करोनाचा मुक्काम हलण्याची काहीच शक्यता नी असेच चित्र आहे. कारण, आजच्या एकाच दिवसात राज्यात थेट २९४० रुग्ण वाढले आहेत.

महाराष्ट्र राज्य हे भारतातील सर्वाधिक प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे. तसेच मुंबई व पुण्यासारखी मोठी शहरेही राज्यात आहेत. त्यामुळे अतिघनता असलेल्या या शहरात आणि आता थेट ग्रामीण भागात कोविड १९ चे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत राज्यात ही रुग्णसंख्या ४४ हजार ५८२ वर पोहोचली आहे. मागील चोवीस तासात करोनाचे ६३ रुग्ण दगावले आहेत, तर ८५७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*