नमाजासाठी जमले एकत्र; पोलिसांनी हटकले तर केला थेट हल्ला

लखनौ :

करोना विषाणूमुळे पसरणाऱ्या कोविड १९ आजाराचा कहर जगभरात वेगाने वाढत आहे. अशावेळी सर्व धामिर्क स्थळ बंद असतानाही काहीजण ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. असाच प्रकार उत्तरप्रदेश राज्यातील बहराइच येथे घडला आहे. नमाजासाठी एकत्र जमल्यावर पोलिसांनी हटकले तर २० जनांनी थेट पोलिसांवर हल्ला केला आहे.

बहराइच येथील हुजूरपुर पोलीस स्टेशनच्या भागातील एका मशिदीमध्ये अशी घटना घडल्याची ब्रेकिंग न्यूज नवभारत टाईम्स वृत्तपत्राने दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दोन पोलीस येथे बंदोबस्तावर होते. त्यावेळी सुमारे २० जण नमाज पढण्यासाठी येथे आले. त्यावर पोलिसांनी आरोग्याच्या काळजीमुळे नमाज अदा करण्याऐवजी घरी जाण्याचा सल्ला दिला. त्यावर हे लोक भडकले आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. मग पोलिसांची जादा कुमक बोलावून घेऊन ९ पुरुष व ४ महिलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*