‘विटॅमिन डी’ आणि करोनाच्या संबंधाबाबत संशोधक म्हणतात की..

करोना विषाणूमुळे कोविड १९ आजार झाल्याने जगभरात ३ लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी या पाच महिन्यात या विषाणूला मरणाऱ्या विविध औषधांच्या लिस्ट आणि त्यांच्या रेसिपीज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. आताही ड जीवनसत्व (विटॅमिन डी) वापरून करोनावर मात करणे शक्य असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. त्यावर संशोधकांनी मत मांडले आहे.

इंग्लंड देशातील यूनिवर्सिटी ऑफ ब्रिगटन येथील प्रा. कोलिन स्मिथ यांनी म्हटले आहे की, ड जीवनसत्व आणि कोविड १९ चे रुग्ण बरा होण्याचा कोणताही संबंध नाही. आतापर्यंत अशा पद्धतीने कोणताही रुग्ण बरा झालेला नाही. तसेच यावर संशोधन झालेले नाही. मात्र, काहीजण याच्या अफवा सोशल मिडीयावर शेअर करीत आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये.

ड जीवनसत्व हे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविणे आणि हाडांच्या मजबुतीसाठी गरजेचे असते. मात्र, त्यामुळे थेट रुग्ण बरे होत नसल्याचा दावा स्मिथ यांनी केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*