IPL म्हणजे पैसे कमविण्याचा धंदा; एलन बॉर्डर यांची टीका

मुंबई :

जगभरातील क्रिकेटपटू आणि क्रिकेट शौकिनांना वेड लावणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये फ़क़्त पैसे कमविण्याचा धंदा सुरू असल्याची टीका ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कर्णधार एलन बॉर्डर यांनी केली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये होऊ घातलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेला करोना विषाणूमुळे स्थगिती दिली जाणार आहे. मात्र, त्याचवेळी भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात IPL स्पर्धेचे सामने आयोजित करण्याचे नियोजन सुरू असल्याची बातमी धडकली आहे. त्यावर एलन बॉर्डर यांनी संताप व्यक्त केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, आंतराष्ट्रीय स्पर्धा कोविड १९ मुळे बंद केल्या जात आहेत. अशावेळी फ़क़्त धंद्याचा विचार करून जर भारतात ही स्पर्धा झाली तर मी याच्याविरुद्ध आवाज उठविणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*