‘लास्ट इअर’वाल्यांच्या परीक्षा गरजेच्या; राज्यपालांचा अभिप्राय

मुंबई :

करोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी यंदा शाळा व विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात येत आहेत. मात्र, शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात की नकोत, यावर अंतिम निर्णय बाकी आहे. अशावेळी या परीक्षा गरजेच्या असल्याचा अभिप्राय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिला आहे.

याबाबतची माहिती राज्यपाल कार्यालयाने ट्विटर खात्यावर टाकली आहे. त्यात म्हटले आहे की, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पदवी प्रदान करणे योग्य होणार नाही असे मत राज्यपालांनी व्यक्त केले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडविण्याची सुचना केली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*