रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या अधिक

दिल्ली :-

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले होते की, रेल्वेचे तिकीट कोणत्याही रेल्वे स्टेशनवर तसेच कुठल्याही खासगी एजंटकडे मिळणार नाही. रेल्वेचा प्रवासासाठी लागणारे तिकीट फक्त ऑनलाइन मिळणार आहे. आता या नियमात बदल केला असून संगणकीय पीआरएस काउंटरद्वारे तिकिटे बुक केली जाऊ शकतात. तसेच पोस्ट ऑफिसेमधे, यात्री तिकिट सुविधा केंद्रामधे आणि ऑनलाईनही तिकीट मिळणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

विशेष रेल्वेसाठी तिकीट बुकिंग मधील बदल हे ३१ मे पर्यंत करता येऊ शकतात. तसेच राजधानी मार्गावर १५ गाड्यांची जोड्या जाणार आहेत. या गाड्यांचा आगाऊ आरक्षण कालावधी हा ३० दिवसांपर्यंत वाढविण्यात आलेला आहे.  

गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून एका जागेवर थांबलेली रेल्वे आता पुन्हा धावण्यास तयार झालेली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी 1 जूनपासून रेल्वे सुरू होणार असल्याची माहिती दिली होती.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*