भाजपचा ‘हा’ प्रकारही निषेधार्हच की; आदित्य ठाकरे यांचे ट्विट

मुंबई :

राज्यातील करोनाचा कहर काहीकेल्या कमी होत नसल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे. अशावेळी सरकारला मदत करण्याचे धोरण ठेवण्याऐवजी थेट प्रतीकात्मक आंदोलन केले आहे. त्यामध्ये अगदी लहान मुलांनाही भाजपने सहभागी केले आहेत. त्यावर हा प्रकार निषेधार्ह असल्याचे ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र भाजपने आज दिवसभर ‘महाराष्ट्र बचाव’चा नारा देत घरोघरी राहून आंदोलन केले आहे. काही नेत्यांनी १०-१२ जणांनी एकत्रित येऊन आंदोलन केले आहे. तर, अगदी बारीक मुलांनाही पक्षाचे झेंडे हातात देऊन भाजपने प्रतीकात्मक फोटो टाकला आहे. ही मुले उन्हात आणि भर रस्त्यावर उभे आहेत. त्याचाच निषेध होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*