सचिन सावंत यांनी पुन्हा केली भाजपची पोलखोल

मुंबई :

काल दिवसभरात महाराष्ट्राच्या राजकारणाचे दोन ट्रेंड सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत होते. पहिला म्हणजे ‘महाराष्ट्रद्रोही बीजेपी’ जो महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ होता आणि दुसरा म्हणजे ‘महाराष्ट्र बचाव’ जो भाजप चालवत होते.
आता सर्वसाधरणपणे महाराष्ट्र बचाव हा ट्रेंड महाराष्ट्रातून दिसणं अपेक्षित होतं. परंतु महाराष्ट्र बचाव हा ट्रेंड लखनऊमध्ये, यूपीमध्ये आणि बिहार मध्ये टॉप ट्रेंड होता. यावेळी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपची पोलखोल करत विचारले की, लखनौ, युपी व बिहार मध्ये #MaharashtraBachao टॉप ट्रेंड कसा? महाराष्ट्रला वाचवायला युपी व बिहारची मदत का?


तसेच ‘हा महाराष्ट्र द्रोहच आहे. आता तुम्ही उठाबशा काढा. लवकर’ असे म्हणत त्यांनी आशिष शेलारांना टोला लगावला आहे.
24 X 7 X 365 खोटे बोलणार्‍या भाजपचा हॅशटॅग UP अन् बिहारच काय तर लखनौमध्येही ट्रेंड करतो, यावरून तुमचे ट्वीट नेमके कुठून पडत होते ते सिद्ध होतं.


हॅशटॅग चालवण्यासाठी तुम्हाला परराज्यांची मदत घ्यावी लागते. भाजप महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्र वाचवायची क्षमता नाही, असेही त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*