राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे ‘ही’ सूचना

मुंबई :

दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा बाकी आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘अंतिम परीक्षा बाकी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितले आहे. तसेच त्यासाठी आणखी विलंब करू नका. त्यांच्याबाबतीत तातडीने निर्णय घ्या, असेही ते म्हणाले आहे.

करोनामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची काळजी राज्य सरकार घेत होते. प्राथमिक, माध्यमिक तसेच काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले आहेत तरी पदवीचे शेवटच्या वर्षाचे, पदव्युत्तर तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात असणारे विद्यार्थी यांच्या परीक्षा अजून बाकी आहेत. या विद्यार्थ्यांचा प्रश्न तातडीने निकाली लावावा, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना सांगितले आहे.


आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*