९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वंकष माहिती देणारे राज्य सरकारचे नवीन पोर्टल

मुंबई :

इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वंकष माहिती मोफत देणाऱ्या ‘महाराष्ट्र करिअर’ या पोर्टलचे उद्घाटन काल झाले. शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी या पोर्टलचे वेबिनारद्वारे उद्घाटन काल केले.

या पोर्टलच्या माध्यमातून विविध करिअर, शिष्यवृत्ती, कोर्सेसची माहिती दिली जाणार आहे. तसेच याचा फायदा प्रामुख्याने राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे. राज्य सरकार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची जास्तीत जास्त काळजी घेत आहे. यावेळी शिक्षणमंत्री, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री हे थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी यापूर्वी सांगितले होते की, दहावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत, तर बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*