यूजीसीचा मोठा निर्णय; आता एकाच वेळी घेऊ शकता दोन पदव्या

पुणे :

विद्यापीठाच्या पूर्वीच्या नियमानुसार एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कोर्ससाठी प्रवेश घेणे शक्य नव्हते. परंतु आता यूजीसीने म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विद्याशाखांमधील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. तसेच या दोन्हीही पदवी वैध असतील, असेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे आता कोट्यावधी विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध झाली आहे.

यापूर्वी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दुसऱ्या शाखेतील एखादा विषय घेणे शक्य होते. परंतु एकाच वेळी दोन कोर्सेस करणे शक्य नव्हते. सध्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या तसेच शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्याने विद्यार्थी बारावी एका शाखेत तर पदवी दुसऱ्या शाखेत करतात. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हा ट्रेंड लक्षात घेऊन तसेच शिक्षण क्षेत्रातून होत असलेल्या या मागणीचा सारासार विचार करून त्यास यूजीसीने मान्यता दिली आहे.

यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी देण्याचा विषय बऱ्याच दिवसांपासून विचाराधीन होता. सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना विविध विषयातील ज्ञान आवश्‍यक असते. यापूर्वी एकाच वेळी एकच पदवी घेता येऊ शकत होती. आता आवडीच्या विद्याशाखेवरून विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या घेणे शक्‍य आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*