‘फेसबुक-इन्स्टा’वरही चालवा शॉप; इकॉमर्स प्लॅटफॉर्म होतोय सुरू

मुंबई :

नफ्यात वाढ करण्यासह युजर्सना जखडून ठेवण्यासाठी फेसबुक कंपनी वेगवेगळे फंडे घेऊन येत आहे. आतापर्यंत फ़क़्त सोशल प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम यावर आता आपण आपले दुकानही थाटू शकता आणि त्यावरूनच खरेदी-विक्री करण्याची नवीन सेवा सुरू होत आहे.

ऑनलाईन बिजनेस कंपन्यांनी आता मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. अशावेळी आपणही कुठेच मागे राहू नये यासाठी फेसबुक अट्टाहास करीत आहे. त्यातूनच ही नवी कल्पना आकारास आलेली आहे. त्यानुसार आता कंपनीने छोटे आणि माध्यम व्यापारी यांना लक्ष्य करून नवे फिचर आणण्याची तयारी केली आहे. यामध्ये आपण आपले थेट दुकान चालवू शकणार आहोत. याची अधिकृत सुरुवात लवकरच होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*