शहरातून गावी आलेल्यांना क्वारंटाईन मात्र विमानप्रवास करणाऱ्यांना नाही;ऐसे कैसे चलेगा भाई ?

मुंबई :

नागरी उड्डयन मंत्री हरिदिप सिंह पुरी यांनी ‘विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन राहण्याचा नियम लागू नाही’ असे स्पष्ट केले. यानंतर या निर्णयावर समाजातून अनेक नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.

हजारो किलोमीटर पायपीट करून आम्ही घरी परतलो, आम्हाला अन्न-पाणी काहीही न विचारता थेट १४ दिवस क्वारंटाईन केले आणि हे लोक विमानप्रवास करून येणार तरीही यांना १४ दिवस क्वारंटाईन राहण्याचा नियम लागू नाही, श्रीमंतांना एक न्याय आणि गरिबाला दुसरा, ऐंसे कैसे चलेगा भाई? असे म्हणत सामान्य लोकांनी सवाल उठवला आहे.

आता या निर्णयामुळे सामान्य माणसात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. यापूर्वीही ‘करोना आणला पासपोर्टवाल्यांनी आणि त्रास झाला राशन कार्डवाल्यांना’ अशी मजुरांची भावना सोशल मिडियावर लोक मांडत होते. कदाचित या निर्णयामुळे पुन्हा लोक त्यांना ट्रोल करू शकतात.

सुरुवातीच्या काळात अनेक विमान प्नवासी घरी गेल्यानंतर त्यांच्यात कोरोनाचे लक्षणे आढळून आली होती. सध्या रेल्वे प्रवास, खाजगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. मग विमान प्रवास करणाऱ्यांना का नाही ? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*