नगरची फसवणूक करू नका : गिरीश जाधव

अहमनगर : PressNote

स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये  अगोदरपासूनच मागे असलेल्या अहमदनगर शहराची यावर्षी दांडी उडाली आहे. मागील वर्षी दोन स्टार मिळवणाऱ्या अहमदनगर महानगरपालिकेला यावर्षी एका स्टारवर समाधान मानावे लागलेले आहे. पण अहमदनगर महानगर पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी नगर शहर कचरा मुक्त झाल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र  घेऊन आपलीच पाठ थोपटून घेत आहेत. ही नगर शहराची फसवणूक आहे. असे करू नका असा सल्ला शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे.

याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्दीला दिले आहे. देशातील स्वच्छ शहरांमध्ये राज्यात सर्वप्रथम येऊ पाहणाऱ्या अहमदनगर महानगर पालिकेला यावर्षी अवघा एक स्टार मिळाला.  नगरपासून जवळच असलेल्या आणि लाखो भक्तांच्या वावराने गजबजलेल्या  साईभूमी शिर्डीने मात्र थ्री स्टारचा दर्जा मिळवत देशात नावलौकिक राखला. तर दुसरीकडे देवळाली प्रवरा पालिकेने थ्री स्टारचा दर्जा कायम राखत सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्स्कार देखील मिळवला. या स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी पालिका महापालिकाना एक ते पाच दरम्यान गुणवत्तेनुसार कोणता ना कोणता दर्जा मिळतच असतो. त्या अंगाने जर आपण या निकालाकडे पहिले तर एखाद्या स्पर्धेत स्पर्धक पासापुरते मार्क मिळऊन सहभागाचे प्रमाणपत्र मिळवतो आणि आपण स्वतः उत्कृष्ठ असल्याचे भासवतो असा हा प्रकार असल्याची सध्या शहरात चर्चा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*