तशीच मोदी सरकारमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा चुकली : सातव

मुंबई :

मजुरांना उत्तरप्रदेशात घेऊन निघालेली एक रेल्वे थेट ओडीसामध्ये  पोहोचल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. तसेच मुझफ्फरपूर बिहारला जाणारी रेल्वे पीडीडीयू जंक्शनला पोहोचल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर जशी रेल्वेची दिशा चुकली आहे, तशी मोदी सरकारमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा चुकली आहे, अशी टीका कॉंग्रेस नेते व खासदार राजीव सातव यांनी केली आहे.

आज दिवसभरात रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे दोन रेल्वे वेगळ्याच राज्यात जायला निघाल्या होत्या व वेगळ्याच राज्यात पोहोचल्या आहेत. हि बाब सर्वप्रथम सातव यांनी पुढे आणली होती. यावर अजून मात्र रेल्वे प्रशासनाने कुठलेही उत्तर दिलेले नाही.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, एकूणच केंद्रातील सरकारने देशाची चक्र अशी काही उलटी फिरवली आहेत की काहीच योग्य दिशेने जात नाहीये. ना अर्थव्यवस्था, ना श्रमिकांना त्यांच्या घरी घेऊन जाणाऱ्या ट्रेन्स.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*