सोनू सूदच्या चांगुलपणावर गरीबही फिदा; ट्विटरद्वारे करीत आहे ‘अशा’ पद्धतीने मदत

मुंबई :

करोनाच्या या आपत्कालीन परिस्थितीत श्रीमंत आणि मध्यमवर्गीय जनतेचे चांगले नाही, बरे चालले आहे. मात्र, गरिबांना कोणीही वाली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे. शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांना सध्या मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये काहीजण मदतीला पुढे येत आहेत. अशावेळी प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याने गरिबांना घरी जाण्याच्या मदतीचे खास अभियान हाती घेतले आहे.

पायी जाणाऱ्या मजुरांना आणि गरिबांना सोनू सूद याने सोशल मिडीयावर आवाहन केले आहे. पायी न जाता थोडी कळ काढा आणि आमच्याशी संपर्क करून बसमध्ये बसून घरी जाण्याचे हे अभियान आहे. आतापर्यंत हजारो गरिबांनी सोनुला साद घातली आहे. त्यानेही आपल्या पद्धतीने होईल ती मदत करीत या गरिबांना घरी जाण्यासाठीची सोय केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*