श्रीमंतांची संपत्तीही ताब्यात घ्या; अर्थतज्ज्ञांचे मोदी सरकारला आवाहन..!

दिल्ली :

कोविड १९ च्या या आपत्कालीन परिस्थितीत जगभरातील अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. भारताची परिस्थितीही दयनीय आहे. अशावेळी आता देशातील डाव्या विचारांच्या अर्थतज्ज्ञांनी श्रीमंतांची खासगी संपत्तीही सरकारने ताब्यात घेऊन या संकटावर मात करण्याची मागणी केली आहे.

व्यक्ती तर जगलीच पाहिजे, पण समाज आणि देशही जगणे महत्वाचे आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात देशाला सावरण्यासाठी आणि गरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांना दिलासादायक मदत करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने मोठ्या श्रीमंतांची संपत्ती ताब्यात घेऊन सामाजिक कामासाठी वापरावी. याबाबतचे ट्विट ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय अभ्यासक कंचन गुप्ता यांनी केले आहे.

इतिहासकार रामचंद्र गुहा, राजमोहन गांधी, अभिजीत सेन, योगेंद्र यादव और अभिजीत सेन यांच्यासह एकूण २४ नामांकित विचारवंत आणि अर्थतज्ज्ञांनी ही मागणी केली आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आता या आवाहनावर काय प्रतिसाद देतेययाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व धार्मिक संस्थांचे सोने ताब्यात घेण्याची सूचना केली होती. मात्र, त्यांना भाजप आणि हिंदुत्ववादी मंडळींनी जोरात ट्रोल केले होते. आता यावर सोशल मिडीयावर काय रणकंदन माजतेय याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*