देशातील १० उष्ण ठिकाणांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील या दोन ठिकाणांचा समावेश

दिल्ली :

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उष्णता जाणवू लागली. अजूनही मोठ्या प्रमाणात गर्मी जाणवत आहे. दुपारी बाहेर पडल्यास अंगाची काहिली होत आहे. गेल्या २४ तासात सर्वात जास्त तापमान राजस्थानमध्ये ४६.६ नोंदविले गेले. महाराष्ट्रात नागपूर व चंद्रपूर या दोन ठिकाणी सर्वात जास्त उष्णता आहे.

नागपूरमधे ४५.६ तर चंद्रपूरमधे ४५.५ इतके तापमान नोंदविले गेले आहे. सर्वात जास्त शहरे हि राजस्थान, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये नोंदविले गेले आहे.

तसे पाहता संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत आहे. तसेच देशातही मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये उन्हामुळे चांगलाच उकाडा जाणवत होता. उन्हामुळे अत्यावश्यक सेवा मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या अंगाची काहिली झाली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*