धक्कादायक; आज राज्यात करोनामुळे ६० जणांचा मृत्यू

मुंबई :

आज दिवसभरात कोरोनामुळे ६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात महाराष्ट्रात एकूण २६०८ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आता एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ४७१९० झाली असल्याचे वृत्त दै. महाराष्ट्र टाईम्सने दिले.

आज झालेल्या मृत्यूची संख्या पाहून लोकांना हादरा बसला आहे. एकाच दिवसात एवढे मृत्यू झाल्याने यंत्रणासुध्दा धास्तावली आहे.  महाराष्ट्रात सध्या ३२,२०१ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाचा हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यंत्रणा सर्वस्वी प्रयत्न करत आहेत.

आज दिवसभरात कोरोनाबाधीत रुग्णांचे प्रमाण जरी वाढले असले तरीही कोरोनापासून मुक्ती मिळवणार्‍या रुग्णांची संख्याही आठशेपेक्षा अधिक आहे. जवळपास एका दिवसात ८२१ कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*