ठाकरेंना रेल्वेमंत्र्यांनी दिले ‘हे’ चॅलेंज; पहा काय आहे विषय

मुंबई :

महाराष्ट्राला मागणीनुसार रेल्वेची सुविधा मिळत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिवसाला १२५ ट्रेन देण्याचे आश्वासन देताना खास आव्हानही दिले आहे.

याबाबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवर म्हटले आहे की,

महाराष्ट्रासाठी उद्यापासून 125 श्रमिक ट्रेन द्यायला तयार, जितकी गरज असेल तितक्या ट्रेन उपलब्ध होतील, रेल्वेमंत्री @PiyushGoyal यांची ट्विटरवरून माहिती. आज फेबुवर @OfficeofUT यांनी जाणाऱ्यांची यादी तयार आहे पण गाड्या नाहीत असे सांगितले. आता यादी देतील अशी आशा करूया.

त्यावर एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी रास्त गणित मांडून म्हटले आहे की, आणि एका तासात केवळ लिस्ट द्यायची नाही… १.कुठून ट्रेन चालवायच्या? २.प्रवाशांची ट्रेन नुसार यादी ३. मेडिकल सर्टिफिकेट हे सगळं रेल्वेला हवं आहे एका तासात.. राज्य सरकारनं इतकं करायचं आहे आणि मग रेल्वे काय भोंगा वाजवणार फक्त?

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*