पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संजय राऊतांची सडकून टीका

मुंबई :

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सामना’च्या अग्रलेखाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. ‘वाराणशीला पंतप्रधान मोदी यांनी चार सफाई कामगारांचे पाय धुतले व त्यांचे माणुसकीचे तीर्थ देशाच्या हातावर दिले. ती माणुसकी गेल्या तीन महिन्यांपासून अदृश्य झाली काय?’,असे म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली आहे.

तसेच यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर आणि विरोधी पक्षांना समज दिली आहे.जे मलईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. मंत्रालय, सरकारी कचेऱ्यातील शांतता एक प्रकारची हतबलताच दाखवीत आहे. हे असेच राहिले तर कामगार कपातीप्रमाणे ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल, असा टोला लगावत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकारला घरचा आहेर केला आहे.

राजकारण बंद करा व लोकांच्या प्रश्नांकडे पहा. ही राजकारण करण्याची वेळ नाही हे समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्रातले ‘ठाकरे सरकार’ कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरल्याची घंटागाडी वाजवत महाराष्ट्राचा विरोधी पक्ष पुनः पुन्हा राजभवनाची पायरी चढतो आहे, आंदोलने करतो आहे. अपयशाचे म्हणायचे तर मग कोरोनाच्या बाबतीत सगळ्यात अपयशी राज्य म्हणून उत्तर प्रदेश आणि गुजरातकडे पाहावे लागेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*