मंदीत संधी; मुंबईत आहेत तब्बल ८ लाख लोकांना नोकरीची संधी

मुंबई :

जगभरात करोनाने हाहाकार माजवला आणि जवळपास जगभरात सर्वच देशांनी लॉकडाउन केले. त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. आज अनेक मोठ्या कंपन्यांनी लोकांना कामावरून काढले आहे. बेरोजगारीची मोठी लाट देशात येणार आहे. परप्रांतीय मजूर गावी गेले आहेत. हीच महाराष्ट्रातील तरुणांसाठी संधी ठरणार आहे. मुंबईत विविध क्षेत्रांमध्ये भूमिपुत्रांसाठी तब्बल आठ लाख रोजगार उपलब्ध झाले आहेत.

मुंबईत सोने चांदीचा ६५ % व्यवसाय आहे. या क्षेत्रात काम करणारे कामगार हे पश्चिम बंगाल, ओरिसा व उत्तर प्रदेशातील आहेत. आता ते गावी गेले असल्यामुळे या क्षेत्रात लाखो जागांसाठी संधी मुंबईतील बेरोजगारांसाठी आहे. जवळपास साडेपाच लाख लोकांना या क्षेत्रात नवीन काम करण्याची संधी आहे.

तसेच मुंबई आणि परिसरातील भागात बांधकाम क्षेत्रात जवळपास १ लाख लोकांना कामाची संधी आहे. कारण या क्षेत्रात काम करणारे ८० टक्के मजूर हे परप्रांतीय आहेत. त्यामुळे बांधकाम सुरू होताच या क्षेत्रात किमान १ लाख रोजगार असेल.

मुंबईत कपड्यांच्या दुकानात जवळपास २० ते २५ हजार लोकांना कामासाठी संधी आहेत.

‘सध्या नोकरवर्ग सर्व गावी गेला आहे. यामुळे दुकाने सुरू झाल्यानंतरही रोजगार उपलब्ध नसेल. ती संधी स्थानिकांना असेल. मोठी दुकाने आधी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यात २० ते २५ हजारांचा तरी रोजगार स्थानिकांसाठी उपलब्ध होऊ शकेल.’ अशी माहिती मुंबई किरकोळ वस्त्रोद्योग असोसिएशन महासंघाचे सचिव शैलेंद्र तिवारी व हरेन मेहता यांनी दिली.

कशा आहेत विविध क्षेत्रांमध्ये आठ लाख नोकऱ्या

  • सराफा – ५.४० लाख
  • बांधकाम – १ ते १.१० लाख
  • कापड – ७० ते ९० हजार
  • किरकोळ – १ लाख
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*