तर’मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल; संजय राऊतांचा सरकारला घरचा आहेर

मुंबई :

महाराष्ट्रात बेरोजगारी वाढणे हे देशाला परवडणारे नाही असे मी एका वरिष्ठ अधिकाऱ्यास सांगितले तेव्हा त्याने मिश्कील भाष्य केले, मंत्रालयातही अनेकांच्या हातांना काम नाही. तेथे इतरांचे काय घेऊन बसलात? जे मलईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. मंत्रालय, सरकारी कचेऱ्यातील शांतता एक प्रकारची हतबलताच दाखवीत आहे. हे असेच राहिले तर कामगार कपातीप्रमाणे ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल, असा टोला लगावत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकारला घरचा आहेर केला आहे.

पुढे एक ठाकरे सरकारमधील विरोधाभास दाखण्यासाठी त्यांनी एक उदाहरण देत म्हटले आहे की, ‘कोरोना’मुळे आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांचा मोठा गट कामाच्या प्रतीक्षेत रांगेत उभा आहे. त्यांना काम हवे आहे व तो त्यांचा हक्कच आहे. मागेल त्याला काम ही आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा आहे, पण त्यासाठी काम सुरू व्हायला हवे.

स्थलांतरित मजुरांच्या बाबतीत त्यांची भूमिका मांडली आहे की, ज्यांना हिटलरच्या क्रुरतेविषयी राग आहे, हिटलरने ‘ज्यूं’चा छळ केला व मारले म्हणून संताप आहे त्यांनी स्थलांतरित मजुरांच्या बाबतीत काय वर्तन केले? हुकूमशहासुद्धा आपल्या प्रजेची काळजी घेत असतो, पण राज्याराज्यातून तांडेच्या तांडे चालत निघाले. काहींच्या हातात नुकतीच जन्मलेली अर्भके होती. हे सर्व दृश्य राज्यकर्त्यांना विचलित करू शकत नसेल तर कोरोनाने माणुसकीचा अंत केला आहे.

संजय राऊत यांनी मांडलेले काही स्पष्ट मुद्दे आणि भूमिका :-

१) कोरोना रोगापेक्षा बेरोजगारी, भूक यामुळे त्रस्त असलेल्या असंख्य लोकांनी ठिकठिकाणी उद्रेक केले आहेत. 

२) उत्तर प्रदेशातील सीमांवर त्यांच्याच राज्याचे भूमिपुत्र आपापल्या घरी जाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. यातून कायदा-सुव्यवस्थेचे अराजक निर्माण होऊ शकेल. 

३)’कोरोना’च्या’कोरोना’च्या संक्रमणाचे जे संकट आहे त्यापेक्षा नवे संकट माणसाने माणूस म्हणून न वागण्याचे आहे. देश एक आहे, आपण सारे भारतीय एक आहोत हे यावेळी खोटे ठरले.

४) मुंबईतून निघालेल्या उत्तर भारतीयांना आपल्याच राज्यात आणि गावांत येऊ दिले नाही. एखाद्याला आपल्याच गावात आणि घरी जाण्यापासून रोखणे हे कोणत्या कायद्यात बसते? 

५) वाराणशीला पंतप्रधान मोदी यांनी चार सफाई कामगारांचे पाय धुतले व त्यांचे माणुसकीचे तीर्थ देशाच्या हातावर दिले. ती माणुसकी गेल्या तीन महिन्यांपासून अदृश्य झाली काय?

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*