सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार खरीप हंगामासाठी नवे कर्ज

मुंबई :

करोना हे मोठे संकट समोर असताना शेतकऱ्यांना दिलासा देणारे एक पाउल सरकारने उचलले असून आता राज्यातील थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसह सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नवे कर्ज देण्याच्या सूचना राज्य सरकारने जिल्हा बॅंकांसह व्यापारी आणि ग्रामीण बॅंकांना दिल्या आहेत.

करोनाच्या या भयंकर संकटात जवळपास ११ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली आहे. फक्त निधी नाही म्हणून ही कर्जमाफी दिली गेली नाही. पण कर्जमाफी शक्य नसली तरी राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामासाठी तब्बल 8 हजार कोटींची हमी शासनाने घेतली आहे. शासनाच्या या निर्णयाने राष्ट्रीयकृत बॅंका वगळता इतर बॅंकांच्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना नवे कर्ज मिळणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे की, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकूण 60 टक्के अंमलबजावणी झाल्याची माहिती आहे. या योजनेअंतर्गत 32 लाख खातेदारांना लाभ देणे अपेक्षित आहे. मार्च 2020 अखेरीस 19 लाख कर्ज खात्यांमध्ये 12 हजार कोटी शासनाने भरले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*