उष्ण शहर म्हणून जगात ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातील या शहरात ‘नवतपा’ काळ सुरू

अकोला :

जगात उष्ण शहर म्हणून अकोल्याची ओळख आहे. काल तिथे लोकांना उन्हाचा ‘सन’ताप अनुभवायला मिळाला. तिथे आता ‘नवतपा’ काळ सुरू होत आहे. नुकत्याच दोन दिवसापूर्वी तिथे ४६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. सद्यस्थितीत फक्त लोकांच्या अंगाची काहिली होत आहे, पण या नवतपा काळात अकोलेकरांना चमडी सोलावनारे उन सहन करावे लागनार आहे.

नवतपा म्हणजे ज्‍योतिषशास्‍त्राच्‍या गणनेनुसार जेव्‍हा सूर्य रोहिणी नक्षत्रात १५ दिवसांसाठी येतो, त्‍या दिवसापैकी सुरवातीचे नऊ दिवस जास्‍त गर्मीचे असतात. याच सुरुवातीच्‍या नऊ दिवसांना नवतपा म्‍हणतात. आता हा नवतपा काळ सुरु होणार असल्याने अकोलेकरांना आता भयंकर उष्णतेला सामोरे जावे लागणार आहे.   

आधीच हा आग ओकणारा सूर्य ‘सन’ताप वाढवत आहे. त्यात ४६ अंश सेल्सियस तापमानाची झालेली नोंद, अंगाची होणारी काहिली आणि येणारा नवतपा, हि परिस्थिती पाहता अकोलेकर घामाच्या धारांनी न्हावून निघतील हे नक्की आहे. अनेक वर्षांपासून अकोलेकर या परिस्थितीला सामोरे जात आहेत. म्हाताऱ्या माणसांच्या तर हे अंगवळणी पडले आहे.  

हवामान अभ्यासकांनी सांगितल्यानुसार पुढील नऊ दिवस म्हणजे उष्णतेची लाट असून, या दिवसांमध्ये यंदाच्या सर्वोष्ण तापमानाचा सामना अकोलेकरांना करावा लागू शकतो.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*