तर ‘या’ तारखेला शाळा सुरु होण्याच्या शक्यता; शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई :

करोनाच्या या महाभयंकर संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले होते. नंतर शाळेच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या. पण आता हळूहळू सगळे वातावरण शिथिल होत आहे. अशातच आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत असल्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

तसेच पुढे त्यांनी सांगितले आहे की, आठवड्यातील ४८ तास शाळा सुरु राहतील. दोन शिफ्ट मध्ये शाळा सुरु करण्याचा त्यांचा विचार आहे. तसेच शाळांचे तास कमी करण्याचा सोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असणार आहे, असेही त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

शाळा सुरु करताना दोन पर्यांयाचा विचार सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

असे आहेत शाळा सुरु करण्यासाठी दोन पर्याय :-  

  • पहिला पर्याय म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑड आणि इव्हन नंबरनुसार, एक गट सकाळच्या सत्रात तर दुसरा गट दुपारच्या सत्रात असेल.
  • प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे दोन्ही गटांना एक दिवसाआड शाळेत बोलवायचे.  
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*