चीनच्या विरोधात हॉंगकॉंगवाले रस्त्यांवर; नव्या कायद्याला थेट विरोध

दिल्ली :

करोनाचा कहर मिटला की लगोलग हॉंगकॉंगवाल्यांनी पुन्हा एकदा चीनच्या विरोधात बंद पुकारले आहे. नव्या सुरक्षा कायद्याला विरोध करताना आंदोलकांनी रस्त्यांवर उतरून आपला विरोध दर्शवला आहे.

याबाबत बीबीसी हिंदी यांनी विशेष व्हिडिओ शेअर केला आहे. ट्विटरवरील या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, हॉंगकॉंगच्या रस्त्यांवरील हे फुटेज आहे. करोनामुळे होणाऱ्या कोविड १९ आजाराची भीती असतानाही जनतेने सर्व भीती बाजूला सारून आपला विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. चीनने बनविलेल्या नव्या कायद्याला येथील नागरिकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. लोकशाहीच्या समर्थकांवर पोलीस लाठीहल्ला आणि अश्रुधुराचा वापर करीत आहेत. स्वातंत्र्याच्या विचारांना चीन सरकार दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या विरोधात हजारो नागरिक थेट रस्त्यांवर उतरून विरोध प्रदर्शित करीत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*