करोनासोबत जगायला शिकणे म्हणजे..; पहा काय म्हणतेय CM ऑफिस

मुंबई :

लॉकडाऊन चारही आता संपण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अशावेळी आतापर्यंत कोणतीही लस किंवा ठोस औषध शोधण्यात संशोधकांना यश आलेले नाही. त्याचवेळी जगभरातील देशांसह भारत आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळेच केंद्र आणि राज्य सरकारने आता आपला बोलण्याचा टोन बदलून करोनासोबत जगायला शिकण्याचा सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने खास ट्विटर थ्रेड प्रसिद्ध केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे काय शिकायचं? पुढचे काही दिवस, काही महिने आपल्याला मास्क घालूनच समाजात फिरावं लागेल, आपले हात धुत राहावे लागतील, सतत तोंडाला हात न लावणे, एकमेकांपासून अंतरावर राहणे, रस्त्यावर थुंकू नये. कोरोनानंतरचे जग असे असेल. प्रत्येकाने आपापल्या ईश्वराकडे प्रार्थना करा की लवकरात लवकर हे जग ज्या संकटाने ग्रासून टाकले आहे त्या संकटाला नष्ट करून आम्हाला सुखाचे, आनंदाचे आणि निरोगी आयुष्याचे दिवस पुन्हा जगायला मिळो ही प्रार्थना करा! जय हिंद, जय महाराष्ट्र!

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*