त्यानंतर होणार शाळा-कॉलेज सुरू करण्याचा निर्णय : मुख्यमंत्री

मुंबई :

करोनामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षातील बहुसंख्य शाळेज व विद्यापीठ स्तरीय परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, आता शाळा कधी, कशा आणि केंव्हा सुरू कराव्यात यावर अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने विशेष ट्विट केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, आताचा सिझन शेती आणि शिक्षणाचा आहे. आपण जूनमध्ये शाळा, कॉलेज सुरू करू शकतो की नाही याचा अभ्यासगट तयार करून त्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेत आहोत. शाळा पुढे गेल्या तरी शिक्षण कसं चालू ठेवता येईल तेही बघतोय. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णयही महत्त्वाचा आहे.

यावरून असेच स्पष्ट होत आहे की, शैक्षणिक वर्ष कोणत्या तारखेला सुरू करायचे याबाबतचा निर्णय अभ्यास गटाच्या शिफारशींवर ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*