फडणविसांच्या भाजपला ठाकरेंनी हाणला ‘हा’ टोला; पहा काय केले आहे ट्विट

मुंबई :

कोविड १९ च्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकार, प्रशासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था एकदिलाने लढत आहेत. त्याचवेळी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ‘महाराष्ट्र बचाव’ची हाक देऊन आंदोलन पुकारले आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला आहे.

त्यांनी ट्विटरवर पोस्ट करून म्हटले आहे की, फक्त राजकारण म्हणून राजकारण करायचं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेसे नाही आहे. मी महाराष्ट्र जपतो, महाराष्ट्राची संस्कृती जपतो, महाराष्ट्राचे संस्कार जपतो म्हणून माझ्या संस्कारात या अडचणीच्या वेळेला राजकारण करणे बसत नाही, मी राजकारण करणार नाही. हा संकटाचा काळ आहे, कोणीही राजकारण करू नये, अजिबात करू नये. राजकारण तुम्ही सुरू केलं तरी आम्ही नाही करणार, कारण आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि आमच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे. त्या विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही. आपण हळूहळू आपली आयुष्याची गाडी ही पूर्वपदावर आणत आहोत. हळूहळू जसं बंद करत गेलो तसं हळूहळू चालू करत आहोत. आणि रिओपन करताना पावलं अत्यंत खबरदारीने टाकायची आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*