लॉकडाऊनबाबत CMOनी केले ‘हे’ सूचक ट्विट; पहा काय होऊ शकतोय निर्णय

मुंबई :

राज्यातील आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शेतीच्या प्रश्नावर भूमिका मांडणारे विशेष ट्विटर थ्रेड मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार भविष्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार लॉकडाऊनबाबत कोणता निर्णय घेऊ शकते याचीच झलक दिसली आहे.

ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपण हळूहळू आपली आयुष्याची गाडी ही पूर्वपदावर आणत आहोत. हळूहळू जसं बंद करत गेलो तसं हळूहळू चालू करत आहोत. आणि रिओपन करताना पावलं अत्यंत खबरदारीने टाकायची आहेत.

तसेच थ्रेडमध्ये म्हटले आहे की, कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे काय शिकायचं? पुढचे काही दिवस, काही महिने आपल्याला मास्क घालूनच समाजात फिरावं लागेल, आपले हात धुत राहावे लागतील, सतत तोंडाला हात न लावणे, एकमेकांपासून अंतरावर राहणे, रस्त्यावर थुंकू नये. कोरोनानंतरचे जग असे असेल. प्रत्येकाने आपापल्या ईश्वराकडे प्रार्थना करा की लवकरात लवकर हे जग ज्या संकटाने ग्रासून टाकले आहे त्या संकटाला नष्ट करून आम्हाला सुखाचे, आनंदाचे आणि निरोगी आयुष्याचे दिवस पुन्हा जगायला मिळो ही प्रार्थना करा! जय हिंद, जय महाराष्ट्र!

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*