कोरोनावर औषध नाही, हे सत्य असलं तरी..; पहा मुख्यमंत्री काय म्हणतायेत

मुंबई :

महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून भाषण देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना विषाणूवर कोणतेही औषध नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे. तसेच आता या विषाणूसोबत जगण्याची आणि काळजीपूर्वक वागण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी दिल्या आहेत.

त्यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूवर औषध नाही, हे सत्य असलं तरी आपले डॉक्टर्स प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत त्या सगळ्या डॉक्टर्सना, आपल्या युद्धातल्या सैनिकांना जेवढे आपण धन्यवाद देऊ तेवढे थोडे आहेत. मला एका गोष्टीचा अभिमान आहे, माझा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, शहरं आहेत हे सगळे खूप जिद्दीने या लढ्यात उतरले आहेत. मी काल परदेशात असलेल्या एका मराठी डॉक्टरशी बोललो. त्यांच्याशी बोलत असताना मी त्यांना विचारले की तुमच्या देशात काय चाललेले आहे, त्यांनी त्यांच्या देशातली परिस्थिती सांगितली आणि मला असं सांगितले की, “उद्धव जी, आपला महाराष्ट्र ज्या पद्धतीने लढतोय, ही फार अभिमानाची गोष्ट आहे.”

ठाकरेंनी म्हटले आहे की, हाय रिस्क ग्रुप, ५५ वर्षांच्या वर, ज्यांना मधुमेह, रक्तदाब, किडनीचे आजार, इतर आजार असतील त्यांच्यावर कोरोना विषाणू जास्त घातक दुष्परिणाम करतो आणि त्यासाठी आपण पावसाळी साथींपासून दूर राहण्याची गरज आहे. आपल्याकडे पुढचे ८-१० दिवस पुरेल एवढा रक्तसाठा आहे.मी तमाम रक्तदात्यांना नम्र आवाहन करत आहे की महाराष्ट्राला रक्ताची गरज आहे व महाराष्ट्राचं रक्त काय असतं,महाराष्ट्राच्या रक्तामध्ये संकटाविरुद्ध लढण्याची जिद्द आहे हे पुन्हा दाखवायचे आहे म्हणून पुन्हा रक्तदान करण्याची आवश्यकता आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी आपल्याकडे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये हजाराच्या आसपास बेड होते. आज आपण हे हॉस्पिटल्स आणि फील्ड हॉस्पिटल्स यांची एकत्रित संख्या मोजल्यास मे अखेरीस आपण किमान १४,००० बेड आपण उपलब्ध करून देऊ शकतो.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*