एकाच दिवसात करोना टेस्टचा चीनने केला विक्रम; पहा काय आहे तिथली परिस्थिती

बीजिंग :

चीन म्हटले की पोलादी भिंतीच्या पल्याड असलेली जागतिक आर्थिक महासत्ता आणि संशयास्पद देश अशीच प्रतिमा आहे. तिला तडा जाण्याची काहीच शक्यता नाही. उलट करोना विषाणूच्या प्रदुर्भावास चीन जबाबदार असल्याचे आरोप होताना हा संशय आणखी बळावला आहे. मात्र, त्याच चीनने एकाच दिवसात १४ लाख करोना टेस्ट करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

चीन देशातील वूहान हे करोनाच्या राजधानीचे ठिकाण आहे. याच शहरातील करोना नियंत्रित करण्यासाठी आता सर्व नागरिकांची म्हणजे १ कोटी १० लाख जणांची चाचणी करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय चीनने घेतला आहे. त्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभ्या केल्या आहेत. सध्या या देशात ८२ हजार ९७४ कोविड १९ चे रुग्ण असून आतापर्यंत ४६३४ जणांचा यामुळे मृत्यू झालेला आहे. ही सरकारची आकडेवारी आहे. खरे-खोटे चीन सरकार जाणो..

मात्र, याच चीन देशाने आज एकाच दिवसात १४ लाख ७० हजार ९५० इतक्या विक्रमी करोना चाचण्या घेण्याची किमया साधली आहे. एकट्या वूहान शहरात ४ लाख 67 हजार ८४७ चाचण्या केल्याचा दावा चीनने केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*