दोन-पाच नाही, ४० ट्रेनचा झालाय गोंधळ; पहा रेल्वेवाले काय म्हणतायेत यावर..!

मुंबई :

करोना विषाणूमुळे फैलावलेल्या कोविड १९ आजारामुळे भारतात अजूनही लॉकडाऊन लागू आहे. त्याच काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या समन्वयाने श्रमिक स्पेशल ट्रेन चालविण्यात आल्या. महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना या ट्रेनद्वारे घरी पाठविण्यात आल्या. या ट्रेनच्या गोंधळाच्याही बातम्या आल्या. मात्र, असा गोंधळ दोन-पाच ट्रेंनसाठी नाही तर, किमान ४० ट्रेनमध्ये असा गोंधळ उडाला आहे.

नवभारत टाईम्स या आघाडीच्या हिंदी दैनिकाने यावर स्पेशल फिचर न्यूज प्रसिद्ध केली आहे. गोरखपुर येथे जाणारी मुंबईची ट्रेन थेट ओरिसातील रुरकेला येथे पोहोचल्याची बातमी अनेकांनी वाचली असेल. त्यावर सोशल मिडीयामध्ये जोरदार चर्चा झाली होती. मात्र, हा गोंधळ नसून रेल्वेचा चक्काजाम होऊ नये यासाठीची काळजी म्हणून रेल्वे प्रशासनाने ही ‘खबरदारी’ घेतल्याचे ट्विटरवर म्हटले आहे.

ऋत्विक भालेकर यांनी ट्रेन वेगळ्याच मार्गाने गेल्याचा मुद्दा ट्विटरवर मांडला आहे. त्यावर वेस्टर्न रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून प्रत्युत्तर देण्यात आलेले आहे. त्यात म्हटले आहे की, कल्याण-भुसावळ-इटारसी-जबलपूर-माणिकपूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात रेल्वे असल्याने संबंधित रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला होता. विलासपूर-रुरकेला-असनसोल या मार्गाने ही ट्रेन वळविण्यात आली होती.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*