नगरमध्ये वाढले ४ रुग्ण; बाहेरून आलेल्यांमध्ये सापडला करोना विषाणू

अहमदनगर :

मुंबई, पुणे, नाशिक, सोलपुर आणि औरंगाबाद या पाच महानगरांना जोडणाऱ्या अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात करोनाचे आणखी चार नवे रुग्ण सापडले आहेत. बाहेरून आलेल्यांच्या चाचण्या केल्यावर त्यांना कोविड १९ ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत प्रशासनाने अधिकृतरीत्या माहिती देताना म्हटले आहे की, बाहेरच्या जिल्ह्यातून #अहमदनगर जिल्ह्यात आलेल्या ०४ जणांना कोरोनाची लागण. या व्यक्ती #मुंबई, उल्हासनगर, तुर्भे, #औरंगाबाद आदी ठिकाणाहून आल्या होत्या. तसेच #संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका #कोरोना बाधीत रुग्णाचा काल रात्री #नाशिक येथे मृत्यू.

कालही ट्विटर खात्यावर प्रशासनाने म्हटले होते की, #संगमनेर तालुक्यातील निमोण येथील दोन महिलांना कोरोनाची लागण.दि. १९ मे रोजी निमोण येथील एक व्यक्ती नाशिक येथे बाधीत आढळून आली होती.त्याची आई आणि पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह. #नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार. #अहमदनगर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ७४.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*