मनमोहन सिंगांनी मोदींविषयी केलेल्या ‘त्या’ विधानाची कॉंग्रेस प्रवक्त्यांना आठवण

मुंबई :

करोनाच्या या संकटकाळात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची आठवण महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना झाली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की “खरोखरच जे मनमोहन सिंह जी म्हणाले ते दोन्ही वाक्य आठवतात. पहिले म्हणजे इतिहास माझ्याशी दयाळू होईल आणि दुसरे वाक्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी मोठी आपत्ती असतील”, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

माजी पंतप्रधान व अर्थतज्ञ यांची जगभरात दूरदृष्टी आणि अभ्यासू व्यक्ती म्हणून ओळख आहे. त्यांना कधी राजकारण करणे जमले नाही म्हणून ते भारतीय लोकांच्या खूप पसंतीस उतरले नाहीत. म्हणून ते नेहमी म्हणत असतात की, इतिहास माझ्याशी दयाळू होईल. तसेच ‘मोदी हे देशासाठी आपत्ती असतील’ असेही विधान त्यांनी केले होते. आजच्या संकटकाळात मोदींची विशेष मदत राज्याला झाली नाही तसेच आर्थिक पॅकेज फसवे होते, असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. कदाचित याच मुद्यावरून सचिन सावंत यांना भाजपला टोमणा देण्यासाठी मनमोहन सिंगांच्या या वाक्याची आठवण झाली असावी.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*