एकाच दिवसात वाढले ३०४१ रुग्ण; रुग्णसंख्या ५० हजारांच्या पल्याड

मुंबई :

महाराष्ट्र राज्यातील करोना विषाणूचा कहर कमी होण्याची काहीच चिन्हे नाहीत. कारण आजही एकाच दिवसात राज्यात आणखी ३०४१ रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याने ५० हजार रुग्णसंख्येचा टप्पाही पार केला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवर पोस्ट टाकली आहे. त्यांनी सांगितले आहे की, राज्यात आज 3041 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 50231 अशी झाली आहे. आज नवीन 1196 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 14600 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 33988 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*