उद्धव ठाकरे यांना जनता कधीच माफ करणार नाही: योगी आदित्यनाथ

मुंबई :

आपल्या रक्ताने, घामाने महाराष्ट्राला पाणी देणाऱ्या, उन्नत बनवणाऱ्या कामगारांना शिवसेना-कॉंग्रेस सरकारकडून छळ मिळाला आहे आणि या अमानवी व्यवहारासाठी उद्धव ठाकरे यांना जनता कधीच माफ करणार नाही, असे म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले आहेत की, लॉकडाऊनमध्ये कामगारांसोबत धोका झाला आहे. तसेच त्यांना घरी जायला भाग पाडले आणि त्यांना वाऱ्यावर सोडून दिले, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाना साधला आहे.

संजय राऊतजी, एखादा भूक लागलेला मुलगाच आपल्या आईला शोधत असतो. जर महाराष्ट्र सरकारने ‘सावत्र आई’ म्हणून त्यांना आधार दिला असता तर त्या मजुरांना उत्तर प्रदेशात परतायची वेळ नसती आली, असेही त्यांनी म्हटले आहे.

नंतर पुढे त्यांनी म्हटले आहे की, आपली कर्मभूमी सेडण्यासाठी भाग पाडल्यानंतर त्यांच्या काळजीचे नाटक करू नका. सर्व मजूर बंधूंना खात्री आहे, की आता त्यांची जन्मभूमी त्यांची कायमच काळजी घेईल. शिवसेना आणि काँग्रेसनेही खात्री ठेवावी.’      

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*