धक्कादायक: ठाकरे सरकारमधील अजून एका मंत्र्याला करोनाची लागण

मुंबई :

ठाकरे सरकारमधील एक मंत्री नुकतेच करोनामुक्त झाले आहेत. अशातच आता दुसऱ्या एका मंत्र्याला करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर करोनाग्रस्त व्यक्ती हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि ठाकरे सरकारमधील महत्वाच्या मंत्रीपदावर आहेत. त्यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा ‘मतदारसंघ ते मुंबई’ हा प्रवास सतत चालू होता. मुंबईतील कामासाठी त्यांची अनेक लोकांशी भेट झाली असावी आणि याच दरम्यान त्यांना करोनाची लागण झाली असावी. ही घटना समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सध्या त्यांचे वय ६१ वर्षांचे असून आजपर्यंत त्यांनी सरकारमध्ये विविध ठिकाणी मंत्री म्हणून काम केले आहे. काही काळ ते राज्याचे मुख्यमंत्री होते. सुरुवातीला ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती, त्यांनतर करोनावर मात करत ते करोनामुक्त झाले होते.

महाराष्ट्रातील करोनाबधितांची संख्या ५० हजारपेक्षा पुढे गेली असून यापैकी १४,६०० जण करोनामुक्त झाले आहेत. तर आजपर्यंत १६३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*