‘गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये’; राऊतांचा रेल्वेमंत्री गोयल यांना टोला

मुंबई :

उत्तरप्रदेशात निघालेली रेल्वे थेट ओडीसामध्ये पोहोचत होती, तर मुझफ्फरपूर बिहारला जाणारी रेल्वे पीडीडीयू जंक्शनला पोहोचत होती. अशा अनेक रेल्वे रस्ता भरकटल्या होत्या. यावरून रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी ‘ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोहोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये’ असे म्हणत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना टोला लागवला आहे.

रेल्वे विभागाने सांगितल्यानुसार नुकतीच महाराष्ट्र सरकारने आपल्याला गरजेच्या असलेल्या सर्व गाड्यांची यादी रेल्वे मंत्रालयास पोहोच केली होती. आणि नुकतेच १-२ नव्हे तर तब्बल ४० रेल्वे रस्ता चुकल्याची घटना समोर आल्याने संजय राऊत यांना पियुष गोयल यांच्यावर टीका करण्याची आयती संधी हाती आली होती. त्याचा फायदा घेत त्यांनी गोयल यांना ‘ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये’ असे म्हणत टोला लगावला आहे.


आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*