तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते, हॉकीपटू बलबीर सिंग यांचा मृत्यू

मोहाली :

भारतीय हॉकी संघाचे माजी कप्तान, हॉकीपटू बलबीर सिंग(सिनियर) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या जाण्याने अखंड क्रीडाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांचे निधन झाल्याची बातमी फोर्टिस हॉस्पिटलचे अभिजित सिंग यांनी दिली आहे. बलबीर सिंग यांचा जन्म १० ऑक्टोबर १९२४ रोजी झाला होता. त्यांचे वय ९६ वर्षे होते. त्यांना नुकतेच श्वास घेण्यास अडचण येत होती म्हणून फोर्टिस हॉस्पिटल, मोहाली येथे दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते टीमचे ते सदस्य होते. लंडन (1948), हेल्सिंकी (1952) और मेलबोर्न (1956) या ठिकाणी खेळल्या गेलेल्या स्पर्धांमध्ये त्यांना सुवर्णपदक मिळाले होते. आज त्यांच्या नावे सर्वाधिक हॉकी गोल करण्याचा रेकोर्ड आहे. १९५२ मध्ये त्यांनी नेदरलैंड विरुद्ध खेळताना पाच गोल करून रेकॉर्ड बनवला होता.

अनेक वर्ष हॉकी खेळल्यावर, अनेक स्पर्धा जिंकल्यावर मग त्यांनी रिटायरमेंट घेतली. नंतर ते भारतीय हॉकी संघाचे कोच म्हणून काम पाहू लागले. २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांचा गौरव करायचा म्हणून रॉयल ओपेरा हाउस कडून त्यांचा सन्मान केला गेला. आज त्यांच्या जाण्याने क्रीडा आणि विशेषकरून हॉकी विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*